कॅन बायोसिसच्या टीबी-3 व ताबा-जी मुळे ऊसाच्या गुणवत्ता तसेच उत्पादनात वाढ

बारामतीच्या श्री. विलास रामचंद्र भगत यांचा अनुभव

बारामती (जि.पुणे) तालुक्यातील कोर्हाळे बुद्रुक नावाचे गाव ऊस लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. गावातील श्री. विलास रामचंद्र भगत नावाजलेले ऊस ऊत्पादक शेतकरी आहेत. यंदा त्यांनी ऊसाची नव्याने लागवड केली आहे. ऊस संरक्षणासाठी भगत यांनी कॅन बायोसिसच्या टीबी -3 व ताबा-जी आदी उत्पादनांचा वापर केला. टीबी-3 व ताबा- जी च्या वापरामुळे ऊसाच्या फुटव्यात वाढ होत असल्याचा अनुभव भगत यांना आला आहे. ऊसाच्या पानांचा रंग सुद्धा हिरवागार झाल्याचे भगत यांनी स्पष्ट केले आहे. पिकाची जोमदार वाढ होण्याचे सारे श्रेय त्यांनी कॅन बायोसिसला दिले आहे.

कोर्हाळे बुद्रुक गावातील भगत यांच्या ऊसाची जोमदार वाढ झाल्याने पंचक्रोशीतील शेतकरी त्यांच्या ऊस शेतीची पाहणी करण्यास येत आहे. कॅन बायोसिसच्या उत्पादनांचे दृष्य परिणाम इतर शेतकऱ्यानी पाहील्याने त्यांनी सुद्धा ऊस पिकाच्या जोमदार वाढीसाठी कॅन बायोसिसची उत्पादने वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

असा केला टीबी-3 व ताबा-जी चा वापर

➤ लागवडी अगोदर 6 टीबी-3 की. ग्रॅ व 4 की. ग्रॅ ताबा-जी प्रती एकर या प्रमाणात कॅन बायोसिसच्या ऊत्पादनांचा वापर भगत यांनी केला होता.

➤ लागवडीनंतर 16 आठवड्यानंतर मोठ्या बांधणीला 6 टीबी-3 की. ग्रॅ व 4 की. ग्रॅ ताबा-जी प्रती एकर या प्रमाणात कॅन बायोसिसच्या ऊत्पादनांचा वापर भगत यांनी केला होता.

कॅन बायोसिसच्या उत्पादनांचा ऊसावर झालेला परिणाम

ताबा-जी

➤ पोषक तत्वांची वाढ झाली. 
➤ पांढऱ्या मुळ्यांची वाढ झाली. 
➤ फायदेशीर असलेली सुक्ष्मजीव प्रोत्साहीत झाले. 
➤ ऊसाच्या काडांची गुणवत्ता सुधारली.

टीबी - 3

➤ टी बी 3 मध्ये असलेल्या नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जिवाणूंमुळे उसाला सतत नत्र पुरवठा 
जमिनीत पडून राहिलेले फॉस्फेट टीबी-3 ऊसाला ऊपलबद्ध करुन देते. त्यामुळे फॉस्फेट खंताचा 30 टक्क्यांनी खर्च कमी झाला. 
➤ जमिनीत मातीच्या कणांना घट्ट पकडून असलेल्या पोटॅशवर क्रिया करुन पोटॅशची उपलबद्धता टीबी-3 मुळे वाढली.
➤ पांढऱ्या मुळ्याच्या संख्येत फॉस्फेटच्या उपलबद्धतेमुळे भरघोस वाढ झाली. 
➤ पोटॅश उपलब्ध झाल्याने ऊसाच्या फुटव्यांमध्ये वाढ झाली. ऊसाच्या पानांचा रंग हिरवा होवून ऊसाची जोमदार वाढ झाली.

कॅन बायोसिसमुळे ऊसाचे उत्पादन वाढेल 
कॅन बायोसिसच्या ताबा-जी व टीबी-2 या दोन उत्पादनांचा मी ऊसासाठी वापर केला. वरील दोनही उत्पादनांमुळे ऊसाच्या फुटव्यात लक्षणीय वाढ झाली आहे. फुटव्यांच्या वाढत्या संख्येमुळे यंदा ऊसाचे ऊत्पादन वाढेल याची मला अपेक्षा आहे.

श्री. विलास रामचंद्र भगत
मु.पो. कोर्हाळे बुद्रुक ता. बारामती जि. पुणे 
मो. क्र : 9970840085

Share this post on: