वर्तमान परिस्थिती:
एनडीटीव्ही मराठीच्या अलीकडील अहवालानुसार, मागील चार महिन्यांत महाराष्ट्रात ६८ लाख हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाले आहे.
राज्यातील ३४ जिल्ह्यांतील २२८ पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा फटका बसला असून, ६४६ महसुली मंडळे यामुळे प्रभावित झाली आहेत. मुख्यतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये ही परिस्थिती अधिक गंभीर आहे. पावसाच्या माऱ्यामुळे माती वाहून गेली असून, जमिनीचा कस कमी झाला आहे.
ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक आर्थिक व मानसिक आव्हानात्मक बनत चालली आहे. पिकांचे नुकसान, जमिनीची होरपळ आणि उत्पादनातील घट यामुळे शेतकऱ्यांना वारंवार पुन्हा पेरणी किंवा पुनर्प्रक्रिया करावी लागते. जी वेळ, पैसा आणि मेहनत या तिन्हीचा अपव्यय करते. अशा कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी, जमिनीचे आरोग्य सुधारणे आणि तिचा पोत व कस पूर्ववत करणे अत्यावश्यक आहे. यासाठी मायक्रोब्स (सूक्ष्मजीव) हे एक प्रभावी नैसर्गिक साधन ठरू शकतात. ते जमिनीतील जैविक प्रक्रिया पुनरुज्जीवित करतात, पोषक तत्त्वांची उपलब्धता वाढवतात आणि मातीच्या संरचनेत सुधारणा घडवतात. या ब्लॉग मध्ये आपण अतिवृष्टीचे आव्हान – जमिनीचे नुकसान आणि मायक्रोब्सची भूमिका यांविषयी सविस्तर जाणून घेऊ.
अतिवृष्टी म्हणजे काय?
- पावसाचे अचानक जोर धरणे किंवा अनियमित पर्जन्य.
- पावसाचा कालावधी, तीव्रता, आणि वितरण या पैलूंमध्ये झालेला बदल.
- काही वेळा इतका पाऊस पडतो की जमिनीत पाणी साचते आणि मुळांना ऑक्सिजन मिळणे कठीण होते.
अतिवृष्टीमुळे जमिनीवर होणारे परिणाम
- मातीची धूप : पाण्याच्या जोरदार वाहाण्यामुळे वरची माती वाहून जाते, ज्यामुळे जमिनीच्या सुपीकतेत घट होते.
- मातीचे वाहून जाणे : आवश्यक पोषकतत्त्वे माती सोबत वाहून जातात.
- मातीमध्येऑक्सिजनचा अभाव : मातीतील हवा कमी होऊन मुळे श्वास घेऊ शकत नाहीत, ज्यामुळे वनस्पती कमजोर होतात.
- पोषक घटकांची गळती: आवश्यक खनिजे व पोषकतत्त्वे पाण्यासह वाहून जातात.
- मृदा संरचना बिघडणे: जमिनीत उंच-खालच्या भागांमध्ये बदल होतो, ज्यामुळे पाणी योग्यरित्या शोषले जात नाही.
- मृदा जीवजंतूंचे नुकसान: मृदा जीवाणू व सूक्ष्मजीवांवर अतिवृष्टीचा दुष्परिणाम होतो, ज्यामुळे जमिनीत पोषणचक्र बिघडते.
जमिनीचे आरोग्य म्हणजे काय?
- मृदा जीवसृष्टी : जमिनीत असलेल्या जीवजंतूंचा जीवाश्म आणि प्रकारांचे संतुलन.
- कार्बन संधारण: जमिनीत कार्बनची मात्रा, जी जमिनीची सुपीकता वाढवते.
- खनिज संतुलन: मातीतील आवश्यक पोषकतत्त्वांचे प्रमाण आणि त्यांचा समतोल.
- जलधारणा : जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता.
- मृदा सच्छिद्रता : जममिनीतील हवा आणि पाण्यासाठी जागा, जी मुळे वाढीसाठी आवश्यक आहे.
मायक्रोब्स / सूक्ष्मजीव — जमिनीचे मित्र
मायक्रोब्स (Microbes) किंवा सूक्ष्मजीव हे इतके लहान जीव असतात की ते फक्त सूक्ष्मदर्शकाच्या (microscope) सहाय्यानेच दिसू शकतात. हे जीव आपल्या आजूबाजूला, हवेमध्ये, पाण्यात, अन्नात आणि विशेषतः जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात आढळतात.
जमिनीत आढळणारे प्रमुख सूक्ष्मजीव
- बॅक्टेरिया (Bacteria)
हे सर्वात सामान्य आणि मोठ्या संख्येने आढळणारे सूक्ष्मजीव आहेत. काही बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्सेशन करतात. म्हणजेच ते हवेतून नायट्रोजन शोषून जमिनीत साठवतात, जे पिकांसाठी अन्नासारखे असते.
उदा. Rhizobium, Azotobacter
- फंगी (Fungi)
हे बुरशीसारखे जीव आहेत जे मृत वनस्पती, पानं, मुळे यांचे विघटन करून सेंद्रिय पदार्थ (organic matter) मातीमध्ये मिसळतात. काही फायदेशीर फंगी, जसे की Mycorrhiza, पिकांच्या मुळांना अन्नद्रव्ये शोषायला मदत करतात.
- अॅक्टिनोमायसेट्स (Actinomycetes)
हा बॅक्टेरिया आणि फंगी यांच्यातील मधला प्रकार मानला जातो. ते जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात आणि ह्यूमस (humus) तयार करतात, जी जमिनीची सुपीकता वाढवते.
काही अॅक्टिनोमायसेट्स रोगकारक जंतूंवर नियंत्रण ठेवण्यासही मदत करतात.
जमिनीसाठी सूक्ष्मजीव कसे महत्वाचे आहेत?
- सेंद्रिय पदार्थांचे विघटन (Decomposition of Organic Matter)
➤ काय होतं?
जेव्हा झाडांची पानं गळतात, मुळे सुकतात, किंवा शेतीमधून निघालेला कचरा, काड्या-कुजकट अवशेष मातीवर पडतात, तेव्हा ते एकटे विघटित होत नाहीत.
हे विघटन सूक्ष्मजीवांचं काम असतं ते या सेंद्रिय पदार्थांना हळूहळू छोट्या घटकांमध्ये फोडतात.
➤ याचा फायदा काय?
विघटन झाल्यावर तयार होतो ह्युमस (Humus) जो जमिनीत सेंद्रिय कर्ब (Organic Carbon) वाढवतो.
ह्युमस मुळे मातीचा पोत, सुपीकता आणि जलधारण क्षमता वाढते.
उदाहरण: कुजलेल्या पानांपासून तयार होणारी कंपोस्ट ही सूक्ष्मजीवांनी विघटित केलेली नैसर्गिक खत आहे.
- अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवणे (Nutrient Availability)
➤ काय होतं?
जमिनीत अनेक पोषक तत्त्वे असतात, पण ती वनस्पती लगेच वापरू शकत नाहीत, कारण ती अवघड रासायनिक स्वरूपात असतात.
काही सूक्ष्मजीव हे तत्त्वे घटवून, पचवून ती सुलभ स्वरूपात (plant-available form) वनस्पतींना देतात.
➤ याचा फायदा काय?
झाडांना नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम यासारखी खते जास्त वापरावी लागत नाहीत.
नैसर्गिक खतांची कार्यक्षमता वाढते.
उदाहरण: Rhizobium बॅक्टेरिया डाळींच्या मुळांवर गाठ (nodules) तयार करतो आणि हवेतून नायट्रोजन मातीला देतो. Phosphate solubilizing bacteria मातीतील फॉस्फरस वनस्पतींना शोषण्यासाठी सोपं करतात.
- झाडांच्या मुळांना मदत (Root Assistance by Mycorrhiza)
➤ काय होतं?
Mycorrhizal fungi हे एका प्रकारचे फायदेशीर बुरशी आहेत, जे झाडांच्या मुळांशी सहजीवन (symbiosis) निर्माण करतात.
➤ ते नक्की काय करतात?
मुळांभोवती जाळं तयार करतात, ज्यामुळे मुळांची पाणी व अन्न शोषण्याची क्षमता वाढते.
ते विशेषतः फॉस्फरस आणि झिंक यासारखी पोषक तत्त्वे शोषून झाडाला पोहोचवतात.
त्यामुळे पाण्याचा वापर कमी होतो आणि झाडे कमी पाण्यातही चांगली वाढतात.
- रोग नियंत्रण (Disease Suppression)
➤ काय होतं?
जमिनीत काही वाईट बुरशी, बॅक्टेरिया असतात जे झाडांवर रोग आणतात (जसे की मूळ कुजणे, दाणेदारपणा, मर रोग).
➤ सूक्ष्मजीव कसे मदत करतात?
काही फायदेशीर सूक्ष्मजीव अशा रोगकारक सूक्ष्मजीवांशी स्पर्धा करतात, त्यांना पसरू देत नाहीत. काही सूक्ष्मजीव त्यांच्यावर नैसर्गिकरित्या दबाव निर्माण करतात किंवा त्यांना मारून टाकतात. म्हणजे रासायनिक बुरशीनाशकांची गरज कमी होते, आणि झाडांची रोगप्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या वाढते.
- जमिनीची रचना व जलधारण क्षमता सुधारते (Improved Soil Structure & Water Holding)
➤ काय होतं?
सूक्ष्मजीव त्यांच्या हालचालीमुळे आणि स्रावांमुळे (secretions) मातीचे कण एकत्र बांधून दाणेदार (granular) रचना बनवतात.
➤ यामुळे काय फायदे होतात?
- माती सच्छिद्र होते. म्हणजे हवेचा आणि पाण्याचा प्रवेश चांगला होतो.
- पाणी जास्त काळ मातीमध्ये राहते (जलधारण क्षमता वाढते).
- झाडांची मुळे खोलवर आणि बळकट वाढतात.
- शेतीसाठी ही अत्यंत उपयुक्त बाब आहे, विशेषतः पाणी टंचाईच्या भागात.
अतिवृष्टी नंतर मृदा पुनरुज्जीवन – मायक्रोब्स कसे मदत करतात?
- मृदा संरचना पुनर्संचयित करणे: सूक्ष्मजीव जमिनीतील स्फुटता सुधारतात.
- गळती थांबवणे व नूतनीकरण: पोषक घटकांची नासाडी कमी करतात.
- पोषक घटक पुनर्संचयित करणे: जैविक क्रिया वाढवून मृदेत पोषण वाढवतात.
- जलनिकास सुधारणा / निचरा मार्ग सुकर करणे: जमिनीत पाणी योग्यरित्या वाहून जाण्यास मदत करतात.
- रोग नियंत्रण: पावसानंतर निर्माण होणाऱ्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यास मदत.
- सहजीवी (Synergistic) तंत्रे: जैवखते, कम्पोस्ट व माइक्रोबियल इनोकेलंट्स वापरून वाढीला चालना.
अतिवृष्टीनंतर माती पुनरुज्जीवनासाठी कॅन बायोसिसची खालील गुणवत्तापूर्ण मायक्रोबियल उत्पादने वापरा.
शुभारंभ डोस – टी.बी. ३ ग्रॅन्युअल, ताबा जी- ४ किलो, स्पीड कंपोस्ट- ४ किलो आणि मायकोझूट्स – २ किलो आणि ३३ कोटी- १५० ते २०० किलो, तसेच बिजोपचारासाठी बी सीपेल – १०० ग्रॅम (सर्व प्रमाण प्रति एकर याप्रमाणे दिलेले आहे.)
वापर पद्धती:
बिजप्रक्रिया करणे.
जमिनीत थेट मायक्रोबियल उत्पादनांचा वापर.
जैवखते व सूक्ष्मजीव एकत्र वापरणे.
पूर्वतयारी:
मातीची चाचणी: पोषकतत्त्व व pH चे प्रमाण तपासणे.
pH सुधारणा: जमिनीत pH संतुलन राखण्यासाठी उपाय.
उपायांसाठी दिलेल्या उत्पादनांचे प्रमाण, वापर आणि रोगांविषयी अधिक माहितीसाठी कृपया आमच्या तज्ज्ञ कृषी सल्लागारांशी खालील क्रमांकांवर संपर्क करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8484006806, 8484006196