सप्टेंबर व ऑक्टोबर २०२५ मध्ये महाराष्ट्रातील विविध भागांत अतिवृष्टीने थैमान घातले. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार काही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा ४०-६०% अधिक पाऊस झाला आहे. यामुळे शेतीमध्ये भयंकर आर्थिक नुकसान झाले असून, अनेक पिकांवर गंभीर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पारंपारिक रासायनिक उपाय या समस्यांवर तात्पुरते उपयोगी पडत असले, तरी मातीच्या आरोग्याला धोका निर्माण करतात. त्यामुळे अशा संकट काळात पर्यावरणस्नेही जैविक उपाय विशेषतः सूक्ष्मजीव आधारित उपाय हे अधिक महत्त्वाचे ठरतात.
या ब्लॉग मध्ये आपण खालील बाबींची सविस्तर माहिती घेणार आहोत:
- अतिवृष्टीमुळे होणारे मुख्य रोग कोणते?
- त्यांची कारणे व लक्षणे कोणती?
- रोग नियंत्रण व बचावासाठी सूक्ष्मजीवांचे शाश्वत उपाय व उत्पादने.
अतिवृष्टीनंतर आढळणारे प्रमुख रोग
अतिवृष्टीमुळे विविध प्रकारचे रोग एकाचवेळी शेतातील विविध पिकांत दिसून येतात. हे रोग वातावरणातील आर्द्रता, मातीतील पाणी साठा आणि तापमान यांच्या एकत्र परिणामामुळे उद्भवतात. खाली दिलेले रोग विविध पिकांत होऊ शकतात:
मुळ सड (Root Rot):
मुळाभोवती पाणी साचल्याने ऑक्सिजनचा अभाव निर्माण होतो आणि सडणाऱ्या बुरशी किंवा जीवाणूंमुळे मुळे कुजतात.
खोड सड (Stem Rot):
खोडाच्या तळाशी पाणी अडकल्यास खोड सडून झाड कोसळू शकते.
पानांवरील डाग व कोरडेपणा (Leaf Blight):
आर्द्र हवामानात बुरशीचे वाढलेले संक्रमण पानांवर तपकिरी किंवा काळसर डाग निर्माण करते.
पानांवर ठिपके (Leaf Spot):
बुरशी किंवा जीवाणूंमुळे लहान गोलसर ठिपके पानांवर दिसतात, जे हळूहळू वाढतात.
पिके वाळणे/सुकणे (Wilt Disease):
मुळांमधील संक्रमण पिकांपर्यंत पोहोचून पाणी व अन्नद्रव्यांचे वहन थांबवते. परिणामी पिक वाळते.
फळ सड (Fruit Rot):
सतत आर्द्रतेमुळे फळे कुजतात, विशेषतः फळांच्या खालील भागात सड दिसते.
रोप मर (Damping Off):
अंकुरणाच्या काळात लहान रोपे जमिनीच्या पातळीवर सडतात व कोसळतात.
डाऊनी मिल्ड्यू / पावडरी मिल्ड्यू (Downy Mildew / Powdery Mildew)
पानांच्या वर किंवा खाली राखेसारखा, पांढरट थर तयार होतो, जो प्रकाश संश्लेषणात अडथळा आणतो.
जीवाणूजन्य सड (Bacterial Soft Rot):
फळे, कंद किंवा पानांवर पाणीसर, कुजलेला भाग तयार होतो आणि दुर्गंधी सुटते.
करपा (Anthracnose):
फळे, खोड व पाने यांवर गडद, सडलेले ठिपके तयार होतात.
टीप: या रोगांचे प्रमाण पिकाच्या प्रकारानुसार, मातीच्या स्थितीनुसार आणि हवामानानुसार वेगवेगळे असू शकते. त्यामुळे लक्षणे ओळखून त्वरीत योग्य उपाय करणे आवश्यक आहे.
रोगप्रसाराची कारणे
अतिवृष्टीमुळे मातीतील भौतिक, रासायनिक आणि जैविक समतोल बिघडतो. यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्यासाठी आदर्श परिस्थिती तयार होते.
१. पाणथळ परिस्थिती – मुळ्यांभोवती ऑक्सिजनचा अभाव
- मुळ्यांना वाढण्यासाठी आणि श्वसनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.
- अतिवृष्टीमुळे जमिनीत पाणी साचते व त्यामुळे मातीतील ऑक्सिजन कमी होतो.
- मुळे गळतात, सडतात व झाडांची अन्नद्रव्ये शोषण्याची क्षमता कमी होते.
- निर्जीव मुळ्यांवर बुरशी व सडवणारे सूक्ष्मजीव लवकर आक्रमण करतात.
परिणाम: रूट रॉट, स्टेम रॉट यांसारखे गंभीर रोग निर्माण होतात.
२. आर्द्र हवामान – बुरशी व जीवाणूंचा वेगाने प्रसार
- जास्त आर्द्रता, उष्ण हवामान आणि पाण्याचा साठा यामुळे बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो.
- बुरशींचे बीजाणू (spores) हवेतून किंवा पाण्यातून सहज पसरतात.
- याच हवामानात कीटकांची संख्याही वाढते, जे रोगांचा प्रसार अधिक करतात.
परिणाम: लीफ ब्लाईट, फ्रुट रॉट, मिल्ड्यू, बॅक्टरीअल रोग व आजार यांचा उद्रेक.
३. पोषकतत्त्वांची कमतरता – मातीतील खनिजे धुवून जाणे
- अतिपावसामुळे मातीतील नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये पाण्यासोबत खाली निघून जातात (leaching).
- ही पोषक तत्त्वे कमी झाल्यास झाडांची रोगप्रतिकारशक्ती घटते.
- कमकुवत झाडांवर रोगांचा प्रभाव अधिक होतो.
परिणाम: झाडांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात, व रोगांना प्रतिकार करण्याची ताकद कमी होते.
४. मातीतील सूक्ष्मजीव संतुलन बिघडणे
- चांगले सूक्ष्मजीव मातीतील आरोग्य टिकवण्यासाठी मदत करतात. (जसे की Trichoderma, Rhizobium, Bacillus इ.)
- पाण्याच्या अतिरेकामुळे हे उपयुक्त सूक्ष्मजीव मरतात.
- परिणामी, मोकळ्या जागेवर हानिकारक रोगकारक (pathogens) सूक्ष्मजीव जागा घेतात व वाढतात.
परिणाम: जैविक संतुलन बिघडल्याने मुळे व खोडांवरील रोग झपाट्याने पसरतात.
सूक्ष्मजीवांचा प्रभावी उपाय – कॅन बायोसिस जैविक उत्पादने कशी मदत करतात?
अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. शेतात उभ्या असलेल्या पिकांची मुळं सडतात, पिके वाळतात, माती निकृष्ट होते आणि पिकांची प्रत व उत्पादन दोन्ही घटतात. कॅन बायोसिस सारखी विश्वसनीय जैविक उत्पादक कंपनी यावर सूक्ष्मजीवांद्वारे पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन परिणामकारक उपाय देते.
१. मुळांचे संरक्षण – नैसर्गिक रोगनियंत्रण
- ट्रायकोडर्मा, सुडोमोनस, बॅसिलस सबटिलिस (Trichoderma, Pseudomonas, Bacillus subtilis) हे फायदेशीर सूक्ष्मजीव मुळाभोवतीचे क्षेत्र व्यापून टाकतात. (rhizosphere colonization).
- हे सूक्ष्मजीव बुरशी व जीवाणूंशी थेट स्पर्धा करतात, त्यांच्यावर हल्ला करतात किंवा त्यांच्या वाढीस अटकाव करतात.
- ते अँटी फंगल व अँटी मायक्रोबियल (Antifungal & Antimicrobial) घटक तयार करतात जे रोगकारकांना मारतात.
परिणाम: रूट रॉट, डम्पिंग ऑफ, स्टेम रॉट सारख्या सडवणाऱ्या आजारांपासून नैसर्गिक संरक्षण.
उपायांसाठी आपण कॅन बायोसिसचे मायकोझुट्स जी, ट्रायकोशिल्ड कॉम्बॅट, सुडो आणि मिलॅस्टीन के ही विषारी अवशेष विरहित जैविक उत्पादने वापरू शकता.
२. मातीचे आरोग्य सुधारणे – सेंद्रिय कर्बात वाढ
- सूक्ष्मजीव मातीतील सच्छिद्रता (crumb structure) वाढवतात, ज्यामुळे पाणी आणि हवेचा प्रवाह सुधारतो.
- जलनिचरा चांगला झाल्याने मुळ्याभोवती पाणी साचत नाही आणि ऑक्सिजनची कमतरता राहत नाही.
- काही सूक्ष्मजीव मातीतील कार्बन आणि जैविक द्रव्ये विघटित करून मातीला पोषणद्रव्ये परत देतात.
परिणाम: जमिनीत “जिवंतपणा” निर्माण होतो. पिकांची मुळे मुक्तपणे वाढू शकतात.
उपायांसाठी आपण कॅन बायोसिसचे स्पीड कंपोस्ट आणि सीएम ३३ वापरू शकता.
३. पोषणद्रव्यांचा पुरवठा – नैसर्गिक खतांची भूमिका
- काही सूक्ष्मजीव हवेमधील नायट्रोजन मातीला उपलब्ध करून देतात. (उदा. Rhizobium, Azotobacter, Azospirillum)
- PSB मुळे मातीतील अघुलनशील फॉस्फरस झाडांना उपलब्ध होतो. (Phosphate Solubilizing Bacteria)
- हे सूक्ष्मजीव पिकांना आवश्यक असलेली झिंक, आयर्न, पोटॅशियम यांसारखी सूक्ष्म पोषकतत्त्वे देखील उपलब्ध करून देतात.
परिणाम: पिकांची वाढ सुधारते, पाने हिरवीगार राहतात, उत्पादन वाढते.
उपायांसाठी आपण कॅन बायोसिसची ताबा जी आणि टिबी ३ ही विषारी अवशेष विरहित जैविक उत्पादने वापरू शकता.
४. रोगप्रतिकारशक्ती वाढवणे – अंतर्गत बळकटीकरण
- सूक्ष्मजीव पिकांमध्ये Systemic Acquired Resistance (SAR) आणि Induced Systemic Resistance (ISR) या नैसर्गिक संरक्षक प्रणाली चालू करतात.
- यामुळे पिके स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम बनतात, अगदी पुढील हल्ल्यापूर्वीच.
- काही बायोस्टिम्युलेटर सूक्ष्मजीव पिकांची मुळे वाढवतात आणि हॉर्मोनसारखे घटक तयार करतात. (जसे कि ऑक्सिन, साइटोकिनिन) –
परिणाम: पिके अधिक मजबूत, रोगप्रतिरोधक आणि हवामान बदलांसाठी सुसह्य बनते.
उपायांसाठी आपण कॅन बायोसिसचे ताबा ड्रिप हे विषारी अवशेष विरहित जैविक उत्पादन वापरू शकता.
५. पर्यावरणस्नेही व शाश्वत उपाय – मातीसाठी दीर्घकालीन गुंतवणूक
- हे जैविक सूक्ष्मजीव रासायनिक औषधांचा पर्याय देतात.
- सूक्ष्मजीव नियंत्रण तर करतातच, याशिवाय जमिनीचं आरोग्यही सुधारतात.
- रासायनिक वापर कमी झाल्यामुळे माती व भूजल प्रदूषण टळतं.
परिणाम: हरित शेती, निरोगी उत्पादने, आणि निसर्गपूरक शेतीव्यवस्था.
शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन फायद्यासाठी – विचारपूर्वक गुंतवणूक, जास्त उत्पादन, उत्तम माती या त्रिसूत्रीवर कार्य करणारी ही उत्पादने आहेत.
उपायांसाठी दिलेल्या उत्पादनांचे प्रमाण, वापर आणि रोगांविषयी अधिक माहितीसाठी कृपया आमच्या तज्ज्ञ कृषी सल्लागारांशी खालील क्रमांकांवर संपर्क करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8484006806, 8484006196