विदर्भात कपाशीसह तूर, सोयाबीन व हरभरा ही पिके घेतली जातात. याच भागातील अमरावती जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी श्री. योगेश पतींगे (रा. नाचोना, ता, दर्यापूर) यांनी यंदा तूर पिकामध्ये मुगाचे आंतरपीक घेतले. पाणी देण्याची सोय नसतानाही त्यांनी योग्य खत व कीडरोग व्यवस्थापनाच्या मदतीने बागायतीसारखे पीक फुलविण्यात यश मिळविले आहे. कॅन बायोसिसच्या 'ताबा'चा वापर केल्याने यंदा तूर पिकाची ४० टक्के उत्पादनवृद्धी झाली. तसेच आंतरपीक म्हणून घेतलेल्या मूगाचेही एकरी २७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे श्री. पतींगे यांनी म्हटले आहे.
श्री. पतींगे यांच्या कुटुंबाकडे चाळीस एकर शेतजमीन आहे. सर्व जमिनीत ते प्रतिवर्षी कपाशी, मूग, तूर व हरभरा अशी पिके घेतात. यंदा पाऊस कमी असल्याने त्यांनी १७ एकर कोरडवाहू जमिनीत तुरीमध्ये मुगाचे आंतरपीक घेतले. पूर्वमशागत केल्यावर त्यांनी पेरणीसाठी खत व्यवस्थापन केले. तसेच पिकाच्या व्यवस्थापनात टॉनिक म्हणून ताबा वापरले. 'ताबा'च्या त्यांनी एकूण चार फवारण्या केल्या. तसेच कीडरोग नियंत्रणासाठी ब्रिगेड-बी आणि बुरशीनाशक वापरले. 'ताबा'च्या फवारणीमुळे पिकाला पूर्वीच्या तुलनेत भरपूर शेंगा आल्या. तसेच कोरडवाहू असूनही पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढली. शेजारील बागायती तूर पिकाप्रमाणेच सध्या श्री. पतींगे यांच्या शेतातील कोरडवाहू तूर डौलत आहे.
मागील हंगामात तूर पीक घेतले होते. त्यावेळी एकरी ६ क्विंटल उत्पादन मिळाले होते. मात्र, यंदा 'ताबा'च्या वापरामुळे आंतरपीक म्हणून घेतलेल्या मुगाचे एकरी ६ क्विंटल उत्पादन मिळाले. तसेच आता तुरीचे पीकही काढणीसाठी असून त्याचेही एकरी ११ क्विंटल उत्पादन मिळण्याची अपेक्षा असल्याचे श्री. पतींगे यांनी सांगितले.
➤ ताबा वापरण्याचे प्रमाण : १-२ मिली / लिटर पाण्यातून फवारणी करावी
ताबा वापरल्याने पिकावर दिसलेले परिणाम
➤ तूर व मूग पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढली
➤ पिकाची शाकीय वाढ जोमाने झाल्याने भरपूर फुलधारणा झाली
➤ फुलगळ कमी प्रमाणात झाल्याने पिकाला भरपूर शेंगा लगडल्या
कॅन बायोसिसच्या उत्पादनांमुळे मिळते हमखास उत्पादनवाढ
विदर्भात बागायती जमिनीत तुरीचे एकरी सरासरी १०-११ क्विंटल उत्पादन मिळते. मात्र, कॅन बायोसिस कंपनीच्या ताबा या टॉनिकमुळे आम्हाला कोरडवाहू जामिनीताही तसाच एकरी उतारा मिळाला आहे. आंतरपीक म्हणून आम्ही मूग पेरणी केली होती. त्यावरही 'ताबा'च्या दोन फवारण्या केल्या होत्या. तुरीवरही हे टॉनिक वापरल्याने पिकाची शाकीय वाढ जोमदार होण्यासह फुलोरा चांगला येऊन आम्हाला एकरी ४० टक्के उत्पादनवाढ मिळाली. इतर शेतकऱ्यांनीही कॅन बायोसिसच्या उत्पादनांचा वापर करावा.
श्री. योगेश पतींगे,
रा. नाचोना, ता. दर्यापूर, जि. अमरावती.
मो. क्र. : 9922169306