कॅन बायोसिसच्या स्पीड कंपोस्टमुळे दोन ट्रॉली सेंद्रीय खताची निर्मिती

जुन्नर तालुक्यातील श्री.अजित गंगाराम घोलप यांचा अनुभव

जुन्नर (जि.पुणे) तालुक्यातील महालक्ष्मीनगर परिसर टोमॅटो व कांदा उत्पादनासाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. परिसरातील श्री. अजित गंगाराम घोलप टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत. एकूण 8 एकर क्षेत्रावर त्यांनी टोमॅटोची लागवड केली होती. टोमॅटोची काढणी झाल्यानंतर रोपांचे अवशेष शेतातच जाळले जात होते. याच दरम्यान कॅन बायोसिसच्या स्पीड कंपोस्टच्या वापराने सेंद्रीय खताची निर्मिती होत असल्याची माहिती घोलप यांना मिळाली. टोमॅटो रोपांचे अवशेष जाळण्यापेक्षा त्याचे सेंद्रीय खत निर्माण करण्याचा निश्चय घोलप यांनी केला. सेंद्रीय खताच्या निर्मितीसाठी त्यांनी स्पीड कंपोस्ट वापरण्याचे ठरवले.

शिवारातील उपलब्ध शेणखत, कोंबडी खत व टोमॅटो रोपांचे अवशेष त्यांनी एकत्र केले. त्यात दोन बॅग स्पीड कंपोस्ट टाकले. स्पीड कंपोस्टमुळे टोमॅटो रोपांचे दांडे तत्काळ कुजण्यास सुरवात झाली. कुठल्याही रोपांची पाने लवकर कुजतात परंतू दांडे लवकर कुजत नाहीत. स्पीड कंपोस्टच्या वापराने रोपांचे अवशेष तत्काळ कुजण्यास सुरवात झाली. स्पीड कंपोस्टमुळे घोलप यांना दोन ट्रॉली सेंद्रीय खत मिळाले आहे. स्पीड कंपोस्टने शेतमालाच्या उत्पादन खर्चात बचत होणार असल्याचे घोलप यांचे म्हणने आहे.

स्पीड कंपोस्टचे फायदे

➤ साधारणपणे एक ते दीड महिन्यामध्ये स्पीड कंपोस्टद्वारे काडी कचर्याचे सेंद्रीय खतामध्ये रुपांतर होते. 
➤ जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढतो. 
➤ जिवाणूंची संख्या वाढते. 
➤ जमिन भुसभुशीत होते. 
➤ जमिनीची पाणी ग्रहण करण्याची क्षमता वाढते.
---------------------------------------------------------
स्पीड कंपोस्ट ही काळाची गरज...

कॅन बायोसिसच्या स्पीड कंपोस्ट नावाच्या उत्पादनामुळे शेतमालाचे अवशेष तत्काळ कुजवले जातात. त्यामुळे सेंद्रीय खताची सहज निर्मिती होते. परिणामी शेतमालाच्या उत्पादन खर्चात बचत होते. उत्पादन खर्च कमी करणारे कॅन बायोसिसचे स्पीड कंपोस्ट काळाची गरज ठरत आहे.

श्री. अजित गंगाराम घोलप 
मु.पो. महालक्ष्मीनगर, ता. जुन्नर. जि. पुणे 
मो. क्र : 9860455476

Share this post on: